स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता मुला-मुलींच्या नव्या वसतिगृहांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। * आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आंतरवासिता मुला-मुलींसाठी प्रत्येकी १५० क्षमतेच्या दोन नव्या वसतिगृहांच्
नमिता मुंदडा


बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

* आ. नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आंतरवासिता मुला-मुलींसाठी प्रत्येकी १५० क्षमतेच्या दोन नव्या वसतिगृहांच्या बांधकामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कामासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेल्या दोन स्वतंत्र शासन निर्णयांद्वारे या दोन्ही वसतिगृहांसाठी मिळून सुमारे २८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार, १५० क्षमतेच्या आंतरवासिता मुलींच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी १४ कोटी १४ लाख १७ हजार ३२२ रुपये इतक्या अंदाजित रकमेस मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर, १५० क्षमतेच्या आंतरवासिता मुलांच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी १३ कोटी ८३ लाख ५३ हजार ३५५ रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

आमदार नमिता मुंदडा यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि आंतरवासिता म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासाची मोठी सोय होणार आहे. या अत्यावश्यक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande