
जेरुसलेम, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।अल-कायदाने ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख करत तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात कथितरीत्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच अमेरिकन आणि इस्रायली प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानांना लक्ष्य करून अशाच प्रकारचे हल्ले करण्याचे आवाहन अल-कायदाने केले आहे.
वृत्तानुसार, ही अपील ‘अल-बयान’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. हे साप्ताहिक प्रकाशन असून, ते जुलैमध्ये अल-कायदाच्या समर्थकांनी सुरू केले होते. हटवण्यात येण्यापूर्वी हे प्रकाशन अल-कायदाशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर शेअर करण्यात आले होते.या लेखात ९/११च्या हल्ल्यांचा तसेच ३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या एफझेड१०७३ या विमानाचे कथित अपहरण करण्याच्या प्रयत्नाचा उल्लेख करण्यात आला होता. या विमानात १७० हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी इस्रायली होते. हे विमान दुबईहून तेल अवीवला जात होते.
वृत्तानुसार, अरबी भाषेत लिहिलेल्या या लेखातून अमेरिकन आणि इस्रायली नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानांवर हल्ले करण्यासाठी ईशारा देण्यात आला होता. लेखात म्हटले होते, “युद्ध अजून संपलेले नाही. झायनिस्ट, अमेरिकन आणि इस्लामविरोधात लढणाऱ्या इतर सर्व काफिरांना घेऊन जाणारी विमाने अजूनही आकाशात आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, जसे ११ आणि ३० सप्टेंबर रोजी झाले.”
लेखात पुढे म्हटले होते, “आज अमेरिका आणि झायनिस्टांचे शत्रू पूर्वीपेक्षा अधिक आहेत. कदाचित देवावर विश्वास नसलेली एखादी व्यक्ती त्यांना लक्ष्य करेल आणि तिच्या या मोहिमेचा अखेरीस इस्लामला फायदा होईल.”तसेच, “एक दिवस असा येईल, जेव्हा दुष्ट अमेरिकेचे साम्राज्य संपुष्टात येईल,” असेही लेखात म्हटले होते.
वृत्तानुसार, या प्रकाशनात ११ सप्टेंबरच्या हल्ल्यादरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकणाऱ्या विमानाचे छायाचित्र तसेच फ्लायदुबईच्या विमानाचे अपहरण करण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आणखी एक छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते.वृत्तानुसार, शनिवारी हे कंटेंट हटवण्यापूर्वी अल-कायदाशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode