एफबीआय कर्मचाऱ्यांचा गोपनीय डेटा चोरल्याचा आरोप; शायनीहंटर्सच्या संशयिताला जॉर्डनमध्ये अटक
अम्मान, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। जगभरातील मोठ्या कंपन्या आणि तपास यंत्रणांची चिंता वाढवणाऱ्या कुख्यात ‘शायनीहंटर्स’ या हॅकर समूहाशी संबंधित एका प्रमुख संशयिताला जॉर्डनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. या हॅकर समूहाने अमेरिकेच्या तपास संस्था एफबीआयमधील प्र
एफबीआय कर्मचाऱ्यांचा गोपनीय डेटा चोरल्याचा आरोप‘ ; शायनीहंटर्स’च्या संशयिताला जॉर्डनमध्ये अटक


अम्मान, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। जगभरातील मोठ्या कंपन्या आणि तपास यंत्रणांची चिंता वाढवणाऱ्या कुख्यात ‘शायनीहंटर्स’ या हॅकर समूहाशी संबंधित एका प्रमुख संशयिताला जॉर्डनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. या हॅकर समूहाने अमेरिकेच्या तपास संस्था एफबीआयमधील प्रत्येक कर्मचाऱ्याचा गोपनीय डेटा चोरल्याचा आरोप आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित तीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अल-दीन खादर नावाच्या संशयिताला जॉर्डनच्या अधिकाऱ्यांनी याच आठवड्यात, मंगळवारी ताब्यात घेतले.त्याच्या अटकेची नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो आता एफबीआय आणि जगभरातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत काम करत असून, या प्रकरणातील इतर हॅकर्सचा शोध घेण्यासाठी मदत करत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सैफ अल-दीन खादरचा कथित हॅकर उपनाव ‘रे’ असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या अटकेबाबत एफबीआयने कोणत्याही विशिष्ट परदेशी कारवाईवर थेट भाष्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, एका निवेदनात संस्थेने सांगितले की, ‘शायनीहंटर्स’शी संबंधित अलीकडील सायबर हल्ल्यांची अत्यंत आक्रमक पद्धतीने चौकशी सुरू आहे. एफबीआयने हेही स्पष्ट केले की, आपल्या सहकारी यंत्रणांसोबत मिळून अनेक संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दोषींना न्यायालयासमोर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असेही संस्थेने म्हटले आहे.

‘शायनीहंटर्स’ हा अत्यंत धोकादायक सायबर खंडणीखोर गट म्हणून ओळखला जातो. या गटामध्ये प्रामुख्याने तरुण आणि इंग्रजी भाषिक हॅकर्सचा समावेश असल्याचे सांगितले जाते. कंपन्यांचा गोपनीय डेटा चोरून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे या गटाचे प्रमुख काम असल्याचा आरोप आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande