
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली असून, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली.
भाजपने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.
तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
या तीनही मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित झाल्याने आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी अधिक स्पष्ट झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु