पवना बंद जलवाहिनी, मोशी कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्याची भाजपची मागणी
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवडमधील पवना बंद जलवाहिनी आणि मोशी कचरा डेपोचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या दौऱ्यात आमदार, पक्
PCMC


पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवडमधील पवना बंद जलवाहिनी आणि मोशी कचरा डेपोचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या दौऱ्यात आमदार, पक्षाचे पदाधिकारी, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले.

झपाट्याने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्यासोबतच सुमारे १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावरही सत्ताधारी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेनंतर तेथे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande