
आनंदोत्सवी कार्यक्रमांपासून दूर राहून शेतकरी व नागरिकांशी संवादाावर भर
लातूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना सहकार मंत्री तथा अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी यंदा कोणतेही सत्कार स्वीकारणार नसल्याची तसेच आनंदोत्सवी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
या भूमिकेच्या अनुषंगाने पाटील मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्याबरोबरच विविध सामाजिक प्रसंगांमध्ये ते सहभागी होत आहेत.
चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील सागर जाधव आणि सूरज जाधव यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन धीर दिला.
दरम्यान, दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सवापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका पाटील यांनी घेतली आहे. मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis