येवला-नांदगाव राज्यमार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Two killed in accident involving a truck and a bus
येवला-नांदगाव राज्यमार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू


उभ्या ट्रकवर मालवाहतूक आयशर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू

येवला, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : येवला-नांदगाव राज्यमार्गावर सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मालवाहतूक आयशर आदळल्याने हा अपघात घडला.

या अपघातात आयशर चालक श्रीकांत चव्हाण (रा. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मनोज राठोड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande