एसआयआरबाबत विरोधकांनी संभ्रम निर्माण करू नये : सुनील केदार
मतदार याद्यांतील दुबार व अपात्र नावे वगळण्याची प्रक्रिया भाजप नाशिक महानगराध्यक्षांचे आवाहन नाशिक, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (एसआयआर) मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मतदार यादीतील दुबार तसेच मय
Opposition should not mislead


मतदार याद्यांतील दुबार व अपात्र नावे वगळण्याची प्रक्रिया

भाजप नाशिक महानगराध्यक्षांचे आवाहन

नाशिक, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (एसआयआर) मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मतदार यादीतील दुबार तसेच मयत व्यक्तींची नावे वगळण्याची प्रक्रिया केली जाणार असून, पात्र मतदारांची नावे कायम राहणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेबाबत विरोधकांनी विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी केले.

एसआयआर ही देशातील नियमित प्रक्रिया असून, यापूर्वीही अशा प्रकारचे पुनरावलोकन झाले आहे. पूर्वी झालेल्या एसआयआरच्या प्रक्रियांबाबत तत्कालीन काळात अशाप्रकारे आक्षेप घेतले गेले नाहीत. आता मतदार याद्यांमधील अपात्र किंवा बोगस नावे कमी होत असतील, तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असे केदार यांनी म्हटले.

एसआयआर मोहीम सुरू करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला प्रत्येक मतदान केंद्रासाठी बीएलए-२ आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक बीएलए-१ नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भाजपने नाशिक महानगरातील १,०४७ मतदान केंद्रांसाठी १,०४७ बीएलए-२ नियुक्त केले असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक बीएलए-१ नियुक्त केला आहे. या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासकीय बीएलओंसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याचे केदार यांनी सांगितले.

राजकीय पक्षांनी एसआयआरच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपल्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. प्रतिनिधी नियुक्त न करता केवळ आरोप-प्रत्यारोप करून संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एसआयआर मोहिमेअंतर्गत अद्याप मतदारांना आवश्यक त्या सुधारणा करण्याची संधी आहे. नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ६, मतदार यादीतील एखाद्या नावाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म क्रमांक ८ भरता येणार आहे.

मतदारांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली माहिती तपासावी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करून एसआयआर मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. विरोधकांनीही आत्मपरीक्षण करून केवळ विरोधासाठी विरोध न करता या प्रक्रियेत सहभागी व्हावे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून, त्याच्यावर विनाकारण शंका उपस्थित करून देशात संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन सुनील केदार यांनी केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande