बीड : तांत्रिक तपासातून शोधले २३ हरवलेले मोबाईल
बीड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीस गेलेले २३ मोबाईल फोन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हे मोबाईल मूळ मालकांच
चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकाला परत


बीड, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीस गेलेले २३ मोबाईल फोन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हे मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि अशोक राडकर यांच्या पथकाने केली.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande