नाशिक - एसएनडीटी आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांत रंगतदार सामने
नाशिक, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांतील सामने उत्साहात पार पडले. दोरीखेचमध्ये सी. बी. शाह महाविद्यालय, सांगलीने विजेतेपद पटकावले. मणिबेन महाविद्यालय, विलेपार्ले
Colorful competitions in various


नाशिक, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांतील सामने उत्साहात पार पडले. दोरीखेचमध्ये सी. बी. शाह महाविद्यालय, सांगलीने विजेतेपद पटकावले. मणिबेन महाविद्यालय, विलेपार्लेने उपविजेतेपद मिळविले. श्रीराम महाविद्यालय, पाणिवने तृतीय, तर एसएनडीटी चर्चगेटने चतुर्थ क्रमांक मिळविला.

धावण्याच्या क्रॉस कंट्री प्रकारात अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयाच्या अदिती पाटील हिने ४४.२४ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला. एसव्हीएलएम टिटवेच्या मानसी लोखंडे हिने ५०.०५ मिनिटांची वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळविला. अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयाच्या सोनिया पडवळे हिने ५१.३३ मिनिटांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला.

दरम्यान, खो-खोच्या पहिल्या उपांत्य सामन्यात एमएमपी शाह माटुंगा आणि एसव्हीएलएम टिटवे यांच्यात चुरशीची लढत झाली. एमएमपी शाह माटुंगाकडून तेजस्वी पोखरकर हिने ३.२५ व ४ मिनिटे पळतीचा खेळ करत आक्रमणात सात गडी बाद केले. पायल भनगे हिने २.१५ व १.३० मिनिटे पळतीचा खेळ करत दोन गडी बाद केले.

एसव्हीएलएम टिटवेकडून अर्चना व्हनमाने हिने २.२५ व १ मिनिट पळतीचा खेळ करत दोन गडी बाद केले. सदिया मुल्ला हिने १.१५ व १.२५ मिनिटे पळतीचा खेळ करत तीन गडी बाद केले. अखेर एसव्हीएलएम टिटवेने हा सामना १५ विरुद्ध १३ अशा दोन गुणांनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात एसएमआरके नाशिकने एसएनडीटी चर्चगेटचा १२ विरुद्ध २ अशा मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. एसएमआरकेकडून सुषमा चौधरी हिने ३.३५ मिनिटांचा खेळ करत दोन गडी बाद केले. ज्योती मेढे हिने ३.५५ मिनिटांचा खेळ करत दोन गडी बाद केले. एसएनडीटी चर्चगेटकडून वैष्णवी परब हिने एक मिनिट खेळ केला.

खो-खोच्या अंतिम सामन्यात एसएमआरके नाशिक आणि एसव्हीएलएम टिटवे आमनेसामने येणार असून, या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande