स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. स्मृती गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील एक प्रमुख क्रिकेटपटू राहिली आहे आणि तिने सं
स्मृती मानधना


नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. स्मृती गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील एक प्रमुख क्रिकेटपटू राहिली आहे आणि तिने संघाच्या सर्व फॉरमॅटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका तिने बजावली आहे. एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून, तिने देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्येही नेतृत्वगुण दाखवले आहेत. तिने नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला २०२४ आणि २०२६ मध्ये महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले.

आपल्या नियुक्तीवर स्मृती मानधना म्हणाली की, भारताचे कर्णधारपद भूषवण्याची जबाबदारी मिळणे हा एक खूप विशेष सन्मान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचे राहिले आहे, आणि आता संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी खूप अनमोल आहे. मी बीसीसीआय, निवड समिती, माझे सहकारी खेळाडू आणि माझ्या या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या व माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाची आभारी आहे.मी हरमनप्रीत आणि कर्णधार म्हणून तिच्या योगदानाचेही स्मरण करू इच्छिते. तिने मोठ्या निष्ठेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि ती आमच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. या भूमिकेसोबत येणारी जबाबदारी मला समजते आणि मी संघासोबत काम करण्यास, एकत्र शिकण्यास आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी माझे सर्वोत्तम योगदान देण्यास उत्सुक आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी स्मृतीचे अभिनंदन करतो. ती अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य भाग राहिली आहे आणि तिने नेहमीच समोरून नेतृत्व करण्याची क्षमता दाखवली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना तिचा अनुभव आणि खेळाची समज अमूल्य ठरेल. “

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, “स्मृतीचे या महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल अभिनंदन. ती भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक बनली आहे आणि भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातील काही सर्वात महत्त्वपूर्ण क्षणांचा भाग राहिली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अर्थ काय आहे हे तिला समजते आणि मला खात्री आहे की ती ही समज कर्णधार म्हणून तिच्या भूमिकेत लागू करेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande