
नाशिक, 06 ऑक्टोबर, (हिं.स.)। मीना भुजबळ स्कूल ऑफ एक्सलन्स (एमबीएसई), नाशिकचा विद्यार्थी सोहम विजय विधाते याने डीएसओ (जिल्हा क्रीडा कार्यालय) आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. सोहमने १७ वर्षांखालील मुलांच्या ५२–५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. त्याने संपूर्ण स्पर्धेत आत्मविश्वास, शिस्त, मेहनत आणि उत्कृष्ट बॉक्सिंग कौशल्य दाखवले.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे सोहमची विभागीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे शाळेचा गौरव झाला आहे. सोहमच्या यशामागे त्याची मेहनत आणि जिद्द तसेच मुख्याध्यापिका सुभ्रा वर्मा मॅडम, क्रीडा शिक्षिका सौ. शारदा वायचळे, क्रीडा शिक्षक इरशाद आलम आणि त्याचे वडील विजय विधाते यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आहे.एमबीएसई परिवारातर्फे सोहमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आले .
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI