अमेरिकेचे प्रसिद्ध वैज्ञानिक फ्रान्सिस हाल्झेन यांना २०२६ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे प्रसिद्ध वैज्ञानिक फ्रान्सिस हाल्झेन यांना २०२६ सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरीच्या निर्मितीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी तसेच अवकाशातून पृथ्वीवर प
फ्रान्सिस हाल्झेन यांना २०२६ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान


स्टॉकहोम, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे प्रसिद्ध वैज्ञानिक फ्रान्सिस हाल्झेन यांना २०२६ सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरीच्या निर्मितीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी तसेच अवकाशातून पृथ्वीवर पोहोचणाऱ्या अत्यंत उच्च-ऊर्जेच्या न्यूट्रिनो कणांचा शोध घेतल्याबद्दल रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांना हा सन्मान दिला आहे. हाल्झेन यांनी आपल्या कारकिर्दीतील मोठा काळ अमेरिकेत व्यतीत केला आहे.

डिसेंबर २०२६ मध्ये स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे फ्रान्सिस हाल्झेन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना पदक, प्रमाणपत्र आणि सुमारे ११.५ कोटी रुपयांची पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरीची संकल्पना याच वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या फ्रान्सिस हाल्झेन यांनी मांडली होती. ही वेधशाळा दूर अवकाशातून येणाऱ्या न्यूट्रिनो कणांचा मागोवा घेते. आइसक्यूबकडून सातत्याने नोंदवल्या जाणाऱ्या न्यूट्रिनोच्या परस्परसंवादाच्या माध्यमातून संशोधकांना अत्यंत उच्च-ऊर्जेचे न्यूट्रिनो कोणत्या हिंसक खगोलीय परिस्थितीत निर्माण होऊ शकतात, याबाबत नवी माहिती मिळणार आहे. तसेच यामुळे यापूर्वी अज्ञात असलेल्या विश्वातील घटनांचाही शोध लागू शकतो.

फ्रान्सिस हाल्झेन यांनी दक्षिण ध्रुवावरील बर्फाचा वापर न्यूट्रिनो नावाच्या कणांचा मागोवा घेण्यासाठी करता येऊ शकतो, हे ओळखले. त्यांची ही संकल्पना आणि वैज्ञानिक नेतृत्व आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरीच्या उभारणीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

आइसक्यूब ही सुमारे एक घन किलोमीटर क्षेत्रफळाच्या बर्फात उभारलेली वेधशाळा असून, त्यामध्ये प्रकाश संवेदक बसवण्यात आले आहेत. आइसक्यूबच्या माध्यमातून संशोधकांना दूरच्या विश्वातील अत्यंत ऊर्जावान प्रक्रियांमधून निर्माण होणारे न्यूट्रिनो कण शोधता येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande