
लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।
*कीर्तावणीचा माध्यमातून रंगकर्मी प्रतिष्ठाण घडवणार पंढरीची वारी*
: 'कीर्तावणी' वारी आडवाटांच्या विठोबाची' अत्यंत लोकप्रिय आणि ज्वलंत मराठी संगीतमय नाटकाचा प्रयोग शनिवार दि. १० आॅक्टोवर रोजी संध्याकाळी ७ वा छञपती शिवाजीराजे महाविद्यालय , उदगीर येथे होणार आहे .
कीर्तावणी हे नाटक महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा, विठ्ठलभक्ती आणि सांस्कृतिक परंपरा यांचे अतिशय सुंदर आणि प्रभावी दर्शन असलेल्या किर्तावणीचे लेखन व दिग्दर्शन रुचिका खोत यांनी केले आहे तर रुचिका खोत व स्वामीराज भिसे यांच्या अभिनयाने व इतर सहा कलावंताच्या गायनाने नटलेल्या कीर्तिवणीचे वैशिष्ट्ये म्हणजे भक्तीरस आणि संगीत नाटकात विठ्ठल भक्तीचा आणि वारीचा स्वर्गीय अनुभव प्रेक्षकांना येतो. त्यातील संगीतमय सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. संपूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे अनेक प्रयोग झाले असून, किर्तावणीला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 'आडवाटांवरून' विठ्ठलाचा शोध घेणारी आणि मानवी मूल्यांवर प्रकाश टाकणारी एक भावनिक कथा आहे किर्तावणी वारी आडवाटांच्या विठोबाची... हे ज्वलंत नाटकातून आध्यात्मिक वारसा, भक्तीभाव आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक जोपासना याचे अप्रतिम दर्शन घडवणार्या किर्तावणीच्या प्रयोगाचे आयोजन रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानने केले आहे. संगीतमय वारीचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, सचीव ज्योती मद्देवाड ,उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी यांच्यासह रंगकर्मी प्रतिष्ठानने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis