ग्रामीण रुग्णालय, शिरूर अनंतपाळ येथे प्रत्यक्ष पाहणी आणि रुग्णांशी संवाद
लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)। आज पंचायत समिती शिरूर अनंतपाळचे सभापती संजय हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालय, शिरूर अनंतपाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील सोयी-सुविधांची व व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी रुग्
संजय सूर्यवंशी


लातूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।

आज पंचायत समिती शिरूर अनंतपाळचे सभापती संजय हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालय, शिरूर अनंतपाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील सोयी-सुविधांची व व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली.

या पाहणी दरम्यान त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाइकांशी थेट संवाद साधला. रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा, उपचारातील गुणवत्ता आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत त्यांनी आस्थेने चौकशी केली.

तसेच रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रुग्णालयासमोर असणाऱ्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. रुग्णालयातील सर्व अडचणी तातडीने मार्गी लावण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी सभापती श्री. संजय हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

यावेळी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande