

शिक्षण सभापतीपदी शरद मोरेंची निवड
नाशिक, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।
- महानगरपालिकेच्या २ विशेष समित्यांच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पिठासन अधिकारी अध्यक्षतेखाली पार पडली.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी कोमल प्रताप मेहरोलीया व उपसभापती पदासाठी चित्रा जगन्नाथ तांदळे आणि शिक्षण समिती सभापती पदासाठी शरद द्रौपदा चिंतामण मोरे व उपसभापती सोनाली तुषार भंदुरे यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली व दोन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांना प्रमाणपत्र दिले व सत्कार महापौर हिमगौरी आहेर -आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते शाम बडोदे, सीमा ठाकरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी केला.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI