
परभणी, 09 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील अकोली बसस्थानक येथे आयशर टेम्पोतून अवैध वाहतूकीच्या १० पशुधानाची पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली.पथकाने बसस्थानक परिसरात एका आयशरची तपासणी केली असता त्यात १० बैल जातीचे पशुधन दाटीवाटीने कोंबलेले आढळून आले. विना परवानगी पशुधनाच्या वाहतूकी प्रकरणी पोलीस हवालदार नामदेव डुबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १० बैल, अंदाजे किंमत ३ लाख ८० हजीर रूपये तसेच आयशर टेम्पो क्रमांक एमएच-१४-बीजे-०१२८, अंदाजे किंमत ७ लाख रूपये असा एकूण १० लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी गंगाधर रामराव आव्हाड (वय ५०) रा. कसबा गल्ली, जिंतूर आणि फैजान इब्राहीम कुरेशी (वय २०) रा. कुरैशी मोहल्ला जिंतूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलीस हवालदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, अनिल राठोड आणि पोलीस अंमलदार राम पोळ यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis