नाशिक - शहरात वीजचोरी प्रकरणात १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
नाशिक, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वीजचोरीच्या घटनांमध्ये १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वीजचोरीचा पहिला प्रकार मुंबई नाका परिसरात घडला. वीज वितरण कंपनीच्या पथकाने मुंबई नाक्यावरील कालिका मंदिरामागे अस
Cases registered against


नाशिक, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या वीजचोरीच्या घटनांमध्ये १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वीजचोरीचा पहिला प्रकार मुंबई नाका परिसरात घडला.

वीज वितरण कंपनीच्या पथकाने मुंबई नाक्यावरील कालिका मंदिरामागे असलेल्या भाविक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी वीज मीटर घराच्या वीज मीटरमध्ये फेरफार करून पाच महिन्यांच्या कालावधीत ५९६ युनिट म्हणजेच १४ हजार १७० रुपयांची वीजचोरी केल्याची बाब लक्षात आली. या प्रकरणी वीज वितरणच्या अधिकारी पूनम वाणी (रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो मुंबई नाका पोलिसांकडे पाठविण्यात आला.

वीजचोरीचा दुसरा प्रकार सावरकरनगर येथे घडला. संशयित राजेश सुभाष पवार व त्यांचे भाडेकरू रितू मुदनूर हे सावरकरनगर येथील लिबर्टी स्टेटस येथे राहतात. तात. त्यांनी घरगुती वीज मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून २,५०० रुपये किमतीची १२१ युनिटची वीजचोरी करून वापरली. या प्रकरणी सातपूर विभागाच्या सहाय्यक अभियंता दीप्ती निशांत मोहरील (रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गंगापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

वीजचोरीचा तिसरा प्रकार एस. टी. कॉलनीत घडला. संशयित हेमकांत भिकाजी पाठक व त्यांचे भाडेकरू नितीन रामदास जगताप यांनी एस. टी. कॉलनीतील साईकृपा अपार्टमेंटमधील घराच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून ३६ हजार १८३ रुपयांची १,५२७ युनिटची वीजचोरी केल्याचे पथकाने टाकलेल्या छाप्यात निदर्शनास आले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

वीजचोरीचा चौथा प्रकार गंगापूर रोड येथे घडला. या प्रकरणी वीज वितरणच्या सहाय्यक अभियंता दीप्ती मोहरील यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले, की संशयित ग्राहक गिरीश राजाराम गरवारे व वापरकर्ता रोशन किशोर देशमुख (रा. नर्मदा अपार्टमेंट, गंगापूर रोड) यांनी घराच्या वीज मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून २,०५८ युनिटची वीज चोरून महावितरणचे ७० हजार ८८० रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गंगापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

वीजचोरीचा पाचवा प्रकार द्वारका व वडाळा परिसरात घडला. याबाबत वीज वितरणचे अधिकारी अनिलकुमार रामनारायण तिवारी (रा. श्रीरामनगर, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की कौसर परविन मकसूद खान यांच्या जागेवरील मोहंमद फारुख खान व राहिल ऊर्फ नाज हमीद शेख यांनी दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या प्लास्टिक दाने निर्मितीच्या कारखान्याकरिता आपल्या आर्थिक फायद्यासाठी वीजचोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याने त्यांना वीजचोरीबद्दल ३ लाख ३२ हजार ६३६ युनिटचे ७० लाख १३ हजार २४० रुपये दंडाचे वीज बिल आकारले आहे; परंतु संबंधितांनी दंडाच्या बिलाचा भरणा केलेला नाही. विद्युत कायद्याच्या कलम १०१ अन्वये संशयित मोहंमद फारुख खान (रा. वडाळा शिवार, कौसर परवीन मकसूद खान, रा. कथडा, जुने नाशिक), राहिल ऊर्फ नाज हमीद शेख यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. वीजचोरीचा सहावा प्रकार वडाळा शिवारात घडला. संशयित कौसर परवीन मकसूद खान यांच्या जागेवर मोहंमद फारुख खान व राहिल ऊर्फ नाज हमीद शेख यांनी १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या बर्फनिर्मितीच्या कारखान्याकरिता आर्थिक फायद्यासाठी अप्रमाणिकपणे वीजचोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याने त्यांना १ लाख २८ हजार ३३१ युनिटची वीजचोर, केल्याबद्दल २७ लाख ५ हजार ९६० रुपये दंडाचे वीज बिल पाठविले; परंतु संबंधिताने दंडाच्या बिलाचा भरणा केला नाही. त्यानुसार या तिघांविरुद्धही नाशिकरोड पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande