रियाधमधील विमानतळावरील हल्ल्यानंतर ३०० हून अधिक उड्डाणे रद्द
रियाध, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर रियाधला जाणारी ३०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.एअर इंडिया, इंडिगो आणि एअ
रियाधमधील विमानतळावरील हल्ल्यानंतर ३०० हून अधिक उड्डाणे रद


रियाध, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर रियाधला जाणारी ३०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.एअर इंडिया, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी सुरक्षेचे कारण देत गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी १० ऑक्टोबरपर्यंत रियाधसाठीची आपली उड्डाणे रद्द केली.

एका प्रत्यक्षदर्शीसह या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रियाध विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानातून धूर निघताना दिसला. विमानांच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या संकेतस्थळांनुसार, जगभरात रियाधशी संबंधित सुमारे ३३३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लुफ्थांसा समूहातील विमान कंपन्यांनीही रियाधसाठीची उड्डाणे थांबवण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियातील या हल्ल्यांमागे इराणसमर्थित हूती बंडखोर असल्याचे सांगितले जात आहे. हूती बंडखोर सौदी अरेबियातील विमानतळे, लष्करी तळ आणि तेल प्रकल्पांना वारंवार लक्ष्य करत आहेत. हूती बंडखोरांनी या जागतिक विमान कंपन्यांना संभाव्य हल्ल्यांच्या परिणामांबाबत इशारा दिला आहे. तसेच, संबंधित ठिकाणे त्यांच्या लष्करी मोहिमेचे केंद्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले, “या प्रदेशातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून आम्ही १० ऑक्टोबरपर्यंत रियाधला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे रद्द केली आहेत. प्रभावित प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवासाची तारीख बदलण्याची किंवा तिकिटे रद्द केल्यास संपूर्ण परतावा घेण्याची सुविधा दिली जात आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.”जर्मनीच्या लुफ्थांसा समूहाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थाला सांगितले, “मध्यपूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही १६ ऑक्टोबरपर्यंत रियाधसाठीची उड्डाणे स्थगित करत आहोत.”

रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्याबाबत एका व्यक्तीने समाजमाध्यमांवर पोस्ट करत प्रवाशांना आवाहन केले की, “विमानतळावर जाण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या विमान कंपनीशी थेट संपर्क साधावा आणि आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासून घ्यावी.”हूती बंडखोरांनी गुरुवारी तिसऱ्यांदा रियाध विमानतळाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. याच्या काही तास आधीच सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने मागील हल्ल्यादरम्यान क्षेपणास्त्रे हवेतच रोखल्याची घोषणा केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande