फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने सुरूच, शेकडो शाळा बंद; ६०० हून अधिक जणांना अटक
पॅरिस, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।शिक्षणासाठीचा निधी वाढवण्याच्या मागणीसाठी फ्रान्समध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राजधानी पॅरिससह देशातील अनेक ठिकाणी गुरुवारीही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्
Student protests continue in France; hundreds of schools closed, over 600 arrested.


पॅरिस, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।शिक्षणासाठीचा निधी वाढवण्याच्या मागणीसाठी फ्रान्समध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राजधानी पॅरिससह देशातील अनेक ठिकाणी गुरुवारीही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी लाठीमार केल्याचे तसेच अश्रुधुराचा वापर केल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे.

ईशान्य पॅरिसमध्ये गुरुवारी विद्यार्थ्यांनी कचराकुंड्यांचा वापर करून एका माध्यमिक शाळेबाहेर अडथळे उभारले. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मंगळवारीही पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला होता. त्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात निदर्शने करण्यात आली होती. या वेळी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांशी झालेल्या झटापटीनंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

गुरुवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान पॅरिसमधील हेलेन बुशे माध्यमिक शाळा झटापटीचे प्रमुख केंद्र ठरली. देशभरातील शेकडो शाळांचे कामकाजही आंदोलनामुळे विस्कळीत झाले. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत ६,६०० हून अधिक जणांना अटक केली आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ३७५ शाळा पूर्णपणे किंवा अंशतः बंद होत्या.

वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी पॅरिसमधील बॅस्टिल चौक परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. येथे निदर्शनांसाठी हजारो विद्यार्थी जमले होते. दूरचित्रवाणीवरील दृश्यांमध्ये पोलिस आंदोलकांना तेथून हटवण्यासाठी लाठीमार करताना दिसले.दरम्यान, विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी बैठक घेतल्यानंतर फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करत असल्याचे सांगितले. फ्रान्समध्ये शाळांची दयनीय स्थिती, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थी संतप्त आहेत. शाळांमधील सुविधा सुधाराव्यात आणि शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande