इराणने ब्रिटनच्या नौदल, हवाई दलाला घोषित केले दहशतवादी संघटना
तेहरान, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।इराण आणि ब्रिटन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणने ब्रिटनची रॉयल नेव्ही (नौदल), रॉयल एअर फोर्स (हवाई दल) आणि ब्रिटनची परदेशी गुप्तचर संस्था एमआय६ यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला आहे.इराणने ब्रिटनच्या सैन्यदलां
इराणने ब्रिटनच्या नौदल, हवाई दलाला घोषित केले दहशतवादी संघटना


तेहरान, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।इराण आणि ब्रिटन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणने ब्रिटनची रॉयल नेव्ही (नौदल), रॉयल एअर फोर्स (हवाई दल) आणि ब्रिटनची परदेशी गुप्तचर संस्था एमआय६ यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला आहे.इराणने ब्रिटनच्या सैन्यदलांना दहशतवादी संघटना, तर गुप्तचर संस्था एमआय६ला शत्रुत्वपूर्ण गट घोषित केले आहे.

वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे ब्रिटनची संपूर्ण लष्करी आणि गुप्तचर यंत्रणा आता इराणच्या सुरक्षा कायद्यांच्या कक्षेत आली आहे.इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनवर आरोप केला आहे की, ब्रिटन आपल्या लष्करी तळांचा आणि रसद पुरवठा सुविधांचा वापर करून तेहरानविरोधातील अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांना मदत करत आहे. ब्रिटनच्या या कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील तत्त्वांचे उघड उल्लंघन असल्याचा दावा इराणने केला आहे.

ब्रिटनने जुलैमध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला (आयआरजीसी) आपल्या ‘स्टेट थ्रेट्स ॲक्ट’च्या कक्षेत आणले होते. त्यानंतर इराणने ही कारवाई केली आहे. ब्रिटनचा हा निर्णय आपल्याविरोधातील शत्रुत्वपूर्ण पाऊल असल्याचे इराणने म्हटले होते.आपल्या निर्णयाचे समर्थन करताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परस्परतेच्या तत्त्वानुसार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या निर्णयाचे जे काही परिणाम होतील, त्यासाठी ब्रिटिश सरकार थेट जबाबदार असेल, असा इशाराही इराणने दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, इराणने आपली कारवाई केवळ ब्रिटनच्या पारंपरिक सैन्यदलांपुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या गुप्तचर यंत्रणेपर्यंतही विस्तारली आहे.

एमआय६ (सीक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस – एसआयएस) ही ब्रिटनची परदेशी गुप्तचर संस्था आहे. परदेशांशी संबंधित गोपनीय माहिती गोळा करणे, दहशतवादी नेटवर्क आणि हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवणे तसेच देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्यांची ओळख पटवून ब्रिटिश सरकारला सतर्क करणे, ही या संस्थेची प्रमुख कामे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande