
बीड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।
नेकनुर पोलिसांची धडक कारवाई
आरोपींकडून नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई करत जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी येथील आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, घरफोडी आणि वाहनचोरीचे तब्बल चार गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis