सुशील कराडसह तिघांवर सोलापुरात गंभीर गुन्हा दाखल; खुनाचा प्रयत्न, पोक्सोसह १४ कलमांचा समावेश
सोलापूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। परळी येथील सुशील वाल्मिक कराड याच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार या तिघांविरुद्ध सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने केले
Gj


सोलापूर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। परळी येथील सुशील वाल्मिक कराड याच्यासह अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार या तिघांविरुद्ध सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आणि न्यायालयीन लढ्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदविला आहे. एकूण १४ गंभीर कलमांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे पती सुशील कराड यांच्याकडे विपणन व्यवस्थापक आणि संगणक परिचालक म्हणून काम करत होते. महिलेने कर्जावर दोन वाहने घेऊन वाहतूक व्यवसाय सुरू केला होता. तसेच परळी वैजनाथ येथे भूखंड खरेदी केला होता. यावरून सुशील कराड याने तिच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

६ मे २०२४ रोजी कार्यालयात डांबून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. तसेच वाहनांच्या चाव्या आणि कागदपत्रे काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर ७ मे रोजी सुशील कराड व त्याच्या साथीदारांनी घरात घुसून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली आणि त्यांच्या नावावर असलेला भूखंड दुसऱ्याच्या नावे करण्यास भाग पाडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande