धाराशिवच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर!
छत्रपती संभाजीनगर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। धाराशिव शहरातील प्रमिला नगर येथे मुख्य रस्त्यावरील नळेगावकर शेताजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार राणा जगजित सिंह यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. प्रभाग क्र. ३ मधील दीर्घकाळापा
धाराशिवच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर!


छत्रपती संभाजीनगर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।

धाराशिव शहरातील प्रमिला नगर येथे मुख्य रस्त्यावरील नळेगावकर शेताजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार राणा जगजित सिंह यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

प्रभाग क्र. ३ मधील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांची दळणवळणाची मोठी अडचण दूर झाली आहे. यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांना अधिक बळ मिळणार आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा संयोजक श्री. नितीन काळे, नगराध्यक्ष सौ. नेहाताई राहुल काकडे, नगरसेवक श्री. राजाभाऊ पवार, नगरसेविका सौ. वैशालीताई सुशांत सोनवणे, श्री. नितीन भोसले, श्री. धनंजय पाटील, श्री. सुशांत सोनवणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात नगरसेवक श्री. राजाभाऊ पवार यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच उल्लेखनीय आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande