वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश संघात बदल
ढाका, १ नोव्हेंबर, (हिं.स.) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठीच्या १५ सदस्यीय संघात बदल केले आहेत. ही कसोटी ५ नोव्हेंबरपासून बांगलादेशातील सिल्हेट येथे खेळवली जाईल. बांग्लादेश क्रिकेटने सोशल मीडियावर जाही
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड लोगो


ढाका, १ नोव्हेंबर, (हिं.स.) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठीच्या १५ सदस्यीय संघात बदल केले आहेत. ही कसोटी ५ नोव्हेंबरपासून बांगलादेशातील सिल्हेट येथे खेळवली जाईल.

बांग्लादेश क्रिकेटने सोशल मीडियावर जाहीर केले की, मोमिनुल हकच्या जागी अमित हसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मोमिनुल सात दिवसांच्या अनिवार्य विश्रांतीवर आहे आणि त्यामुळे तो अनुपलब्ध आहे.

पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मोमिनुल हकला संघातून वगळण्यात आले होते. त्या सामन्यात झाकर अलीने त्याची जागा घेतली होती.

झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज अमित हसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. हसन आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने ५४ सामन्यांमध्ये ५०.५० च्या सरासरीने ४०४० धावा केल्या आहेत.

पहिल्या कसोटीतील पराभवामुळे, सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बांगलादेश चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ:

नाझमुल होसेन शांतो (कर्णधार), शादमन इस्लाम, तन्झिद हसन, तौहिद हृदोय, लिटन दास, झाकेर अली, मेहिदी हसन मिराज, नईम हसन, हसन महमूद, तैजुल इस्लाम, शरीफुल इस्लाम, मुश्फिकुर रहीम, तस्किन अहमद, इबादत होसेन, अमिते हसन.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande