डीआरआयने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात जप्त केल्या 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या ई सिगारेट्स
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर, (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी गुप्त माहिती मिळाली होती. या मालाची खेप मॉप रॉड (Mop Rod) या उत्पादनाची असल्याचे फसव
DRI Seizes  E-cigarettes 4 Cr Jawaharlal Nehru Port Trust


नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर, (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी गुप्त माहिती मिळाली होती. या मालाची खेप मॉप रॉड (Mop Rod) या उत्पादनाची असल्याचे फसवेपणाने घोषित केले गेले होते. मात्र अधिकाऱ्यांनी संबंधित कंटेनरची काटेकोर तपासणीत केल्यावर मॉप रॉड या घोषित उत्पादनामागे लपवलेले युटो थॅनोस (Yuoto Thanos) या ब्रँडचे 6,000 ई सिगारेट्स आणि युटो लेन्स (Yuoto Lens) या ब्रँडच्या 7,000 ई सिगारेट्स आढळून आल्या.

या कारवाईत एकूण 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे 13,000 ई सिगारेट्स आणि त्यासोबतचा इतर माल सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि लोकांना आरोग्याच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ई सिगारेट्स (प्रतिबंध, उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा, 2019 अंतर्गत भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आणि सर्व इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्सवर बंदी घालण्यात आली आहे.

2026-27 या चालू आर्थिक वर्षात, महसूल गुप्तचर संचलनालयाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळ आणि कंटेनर तळांच्या ठिकाणांहून 135 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे सुमारे 3,55,000 ई सिगारेट्स जप्त केले आहेत. या कारवाईतून, सीमेपलीकडून होणाऱ्या तस्करीविरोधात लढा देण्याची आणि देशाच्या आर्थिक तसेच सार्वजनिक आरोग्य हितांचे रक्षण करण्याची महसूल गुप्तचर संचलनालयाची सातत्यपूर्ण वचनबद्धताही अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande