ब्रिटनमध्ये अमेरिकन लष्करी जवानाला अटक; रशियासाठी हेरगिरी केल्याचा संशय
लंडन, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।इंग्लंडमधून मंगळवारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे अमेरिकेच्या लष्करातील एका जवानाला अटक करण्यात आली आहे. इंग्लंडच्या दहशतवादविरोधी पोलिसांनी या अटकेची माहिती दिली आहे. रशियाशी संबंधित हेरगिरी केल्याच्या संशयावर
ब्रिटनमध्ये अमेरिकन लष्करी जवानाला अटक; रशियासाठी हेरगिरी केल्याचा संशय


लंडन, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।इंग्लंडमधून मंगळवारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे अमेरिकेच्या लष्करातील एका जवानाला अटक करण्यात आली आहे. इंग्लंडच्या दहशतवादविरोधी पोलिसांनी या अटकेची माहिती दिली आहे. रशियाशी संबंधित हेरगिरी केल्याच्या संशयावरून या अमेरिकी जवानाला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

इंग्लंड (ब्रिटन) आणि अमेरिका हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे प्रमुख मित्रदेश आहेत. अमेरिकेच्या लष्करातील मोठ्या संख्येने जवान ब्रिटनमध्ये तैनात आहेत. रशियाशी संबंधित हेरगिरीच्या प्रकरणात या जवानाला अटक करण्यात अमेरिकेचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, त्यांच्या दहशतवादविरोधी पथकाने अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अमेरिकी लष्कराच्या सहकार्याने कारवाई केली. त्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अमेरिकी जवानाला अटक करण्यात आली.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडमधील अमेरिकी लष्करी हवाई तळावर हल्ला करण्याचा कट उघडकीस आला होता. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी या हल्ल्याचा कट इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) निर्देशानुसार रचण्यात आल्याचा दावा केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande