पाकिस्तानात अफगाणिस्तान सीमेजवळ ४.० तीव्रतेचा भूकंप
इस्लामाबाद, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानमध्ये रविवारी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्क्लेवर ४.० इतकी नोंदवण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:१८ वाजता १३ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूक
अफगाणिस्तान सीमेजवळ पाकिस्तानात ४.० तीव्रतेचा भूकंप


इस्लामाबाद, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानमध्ये रविवारी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्क्लेवर ४.० इतकी नोंदवण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:१८ वाजता १३ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) च्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पाकिस्तानमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के परिसरात जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश ३२.७९४° उत्तर आणि रेखांश ६९.७४५° पूर्व येथे होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या घटनेचा समावेश ‘पुनरावलोकन केलेली’ श्रेणीत केला आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून २०२ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला, तर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून ३२२ किलोमीटर पश्चिम-दक्षिण पश्चिमेला होता.याशिवाय, हा भूकंप जम्मू-काश्मीरमधील राजौरीपासून ४३० किलोमीटर पश्चिमेला, तर गुलमर्गपासून ४५२ किलोमीटर पश्चिम-दक्षिण पश्चिमेला झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande