
नाशिक, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबईतील चेंबूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून जाणाऱ्या आरोपीला नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अपहरण झालेल्या मुलीला आणि आरोपीला अंबड गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने चेंबूर पोलिसांकडे सोपवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईतील चेंबूर या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने पळून नेल्याची तक्रार 31 ऑक्टोबर रोजी दाखल झाली होती. या तक्रारीतील मुलगी ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी या माहितीची खात्री केली त्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस अधिकारी महिला पुरुष अंबलदार यांनी गुरुवारी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये अपहरण झालेली मुलगी तीच असल्याचे पोलिसावलदार गौरव धात्रक यांनी ओळखले त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या मुली ताब्यात घेऊन यातील मुलीला पळून नेणारा आरोपी प्रशांत ठाकरे उर्फ रवी गायकवाड वय वर्ष 34 राहणार शांतिनिकेतन चाळ रूम नंबर 16 विनोद शुक्ला हायस्कूल जवळ पोस्टल कॉलनी चेंबूर मुंबई 71 याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने पहिली पत्नी असून देखील अल्पवयीन मुलीस फूस लावून आम्ही दाखवून पालकांच्या रखवालदालीतून पळून तिला तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश कोल्हापूर अक्कलकोट सोलापूर गाणगापूर पुरी ओरिसा येथे नेल्याची माहिती दिली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अंबड येथील पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित आरोपी आणि मुलीला चेंबूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे किरण चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस कर्मचारी प्रकाश बोडके योगेश चव्हाण भूषण सोनवणे राजेश महाले महेंद्र धोंडे गौरव धात्रक चारुदत्त निकम हर्षल जाधव अरुण चव्हाण महिला पोलीस सविता कदम आदींनी दिले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI