एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप : भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
ओमान, 12 नोव्हेंबर (हिं.स.)एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीत, कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला ८ गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले
आर्यवीर सेहवाग


ओमान, 12 नोव्हेंबर (हिं.स.)एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीत, कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला ८ गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

आता अंतिम फेरीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशला ९ गडी राखून एकतर्फी पराभूत करून पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर केवळ २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारतीय संघाने ३७ व्या षटकात सहज पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी भारतीय संघासाठी शानदार अर्धशतके झळकावली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.सेहवाग ५७ चेंडूंमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह ५१ धावा करून बाद झाला. त्यानंतर लक्ष्यला व्ही. के. विनीतची साथ मिळाली. विनीत आणि लक्ष्यने दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. या भागीदारीने भारताचा विजय निश्चित केला.मात्र, या काळात लक्ष्यचे शतक हुकले. तो ९० चेंडूंमध्ये १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावा करून बाद झाला. कर्णधार बाद झाल्यानंतर विनीतने खेळपट्टी सांभाळली आणि एक शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ६२ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावा करून संघाचा विजय निश्चित केला.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने भारतासमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार सोहेल खानने एका चौकार आणि एका षटकारासह ४४ चेंडूंमध्ये नाबाद ३६ धावा केल्या. नूर अली नियाझी आठ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानने ८६ धावांत तीन गडी गमावले होते. अबिदुल्ला नादेरजानने १४, फरीदुल्ला एहसासने १३ आणि सुभान जखैलने ४४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. यानंतर नोमान सलारझाई आणि शाह फैसल रहिमी यांनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.

दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७८ चेंडूंमध्ये ५१ धावा करून नोमान बाद झाला. आमिर हमजा आपले खाते उघडू शकला नाही. ताहिर सरवारी केवळ एक धाव करू शकला. शाह फैसल रहिमीने दोन चौकारांच्या मदतीने ७२ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. मोहम्मद अली आठ धावा करून बाद झाला. यानंतर सोहेलने नूरसोबत मिळून अफगाणिस्तानला २२७ धावांपर्यंत पोहोचवले. भारतासाठी इशान सूदने सर्वाधिक तीन बळी घेतले. इशान व्यतिरिक्त, आर्यन सावसानीने भारतासाठी दोन बळी घेतले. काव्या पटेल, यशवर्धन चौहान आणि अर्जुन राजपूत यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande