नाशिकचा मुजतबा सय्यद १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात
नाशिक, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुजतबा सय्यदची बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंटट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. मुजतबा सय्यदहा आक्रमक डावखुरा सलामीचा फलंदाज आहे, तसेच तो उजव्या हाताने उप
Nashik's Mujtaba Syed in Maharashtra


नाशिक, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुजतबा सय्यदची बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंटट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

मुजतबा सय्यदहा आक्रमक डावखुरा सलामीचा फलंदाज आहे, तसेच तो उजव्या हाताने उपयुक्त ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो. मुजतबाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालीलवयोगटातील आमंत्रितांच्या ( एम सी ए इन्व्हिटेशनटूर्नामेंट )क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्हा संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. या स्पर्धेत मागील हंगामात त्याने ११ सामन्यात ९३.६७ च्या सरासरीने ८४३ धावा फटकवल्या. मुजतबाने यात एका फटकेबाज द्विशतकासह- केवळ १८३ चेंडूत नाबाद २५१ धावा - आणखी तीन शतके झळकवली. या जोरदार कामगिरीच्या जोरावर तसेच यंदाच्या निवड चाचणी व सराव सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अर्णव पाटील या १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचा कर्णधार आहे.

बी सी सी आय च्या विजय मर्चंटट्रॉफी स्पर्धेत एलिट बी गटात महाराष्ट्राचे पहिले दोन साखळी सामने १४ ते २१ नोव्हेंबर दरम्यान लखनौ येथे होणार आहेत.महाराष्ट्र संघातील निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सर्व पदाधिकाऱ्यांनी मुजतबाचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande