पाकव्याप्त काश्मीरमध्ये व्हॅन नदीत कोसळून भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू
इस्लामाबाद, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गिलगिट-बाल्टिस्तान भागात प्रवाशांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी ही
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये व्हॅन नदीत कोसळून भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) गिलगिट-बाल्टिस्तान भागात प्रवाशांनी भरलेली व्हॅन नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. गिलगिट येथून घिझर जिल्ह्यातील यासीन खोऱ्याकडे ही व्हॅन जात होती. मोरकाह पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन थेट यासीन नदीत कोसळली.अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीतून १० प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता. तसेच एका लहान मुलासह तीन जखमी प्रवाशांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारांसाठी गुपिस येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे.मृत आणि जखमी झालेले सर्वजण पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील यासीन खोऱ्याचे रहिवासी होते. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande