वडाळा गावात तीन ठिकाणांहून २८० किलो मांसाचे तुकडे जप्त; सात जण ताब्यात
नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। : पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात वडाळा गावातील तीन ठिकाणांहून २८० किलो मांसाच्या तुकड्यांसह ५६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अध
वडाळा गावात तीन ठिकाणांहून २८० किलो मांसाचे तुकडे जप्त; सात जण ताब्यात


नाशिक, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। : पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात वडाळा गावातील तीन ठिकाणांहून २८० किलो मांसाच्या तुकड्यांसह ५६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की वडाळा गावातील म्हाडा कॉलनीच्या मागे गोमांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी म्हाडा कॉलनीमागे असलेल्या सादिकनगर गल्ली नंबर १ येथे एका दोनमजली इमारतीच्या तळमजल्यातील गाळ्यात शोएब इक्बाल कुरेशी (वय २५, रा. गंजमाळ), समीर जाकीर कुरेशी (वय ३५, रा. कुरेशीनगर, वडाळा गाव) व हबीब अजीज कुरेशी (वय २३, रा. मुंबई नाका) हे तीन जण अवैधपणे मांसाचे तुकडे करून विक्री करीत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. पोलिसांनी तेथे झडती घेतली असता तेथून १० हजार रुपये किमतीचे ५० किलो मांसाचे तुकडे, शंभर रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त केला. वरील तिघांना ताब्यात घेऊन जात असताना सादिकनगर गल्ली नंबर २ मध्ये ए गाळ्यात फारुख यासीन शेख (वय ४४, भाभानगर, मुंबई नाका) व अनिश अब्दुल कुरेशी (4 ३९, रा. वडाळा नाका) हे दोघे अवैधरीत्या मांसाचे तुकडे करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३६ हजार रुपये किमतीचे १८० किलो मांसाचे तुकडे, शंभर रुपये किमतीचा कोयता जप्त केला. पोलीस पथक साठेनगरकडून जात असताना सादिकनगर गल्ली नंबर ६ मध्ये फिरोज कमाल कुरेशी (वय ४०, रा. वडाळा गाव) व इद्रिस गुलाम शेख (वय ३८, रा. कुरेशीनगर, वडाळा नाका) या दोघांच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचे ५० किलो मांसाचे तुकडे व १०० रुपये किमतीचा चाकू जप्त केला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण तीन ठिकाणांहून सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून २८० किलो मांसाचे तुकडे, एक कोयता, दोन चाकू असा एकूण ५६ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार महेश पारणकर करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande