छ. संभाजी नगर : पोलिसांकडून २१ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलिसांनी मागील पाच महिन्यांत चोरीस गेलेले आणि हरवलेले तब्बल २१ मोबाईल शोधून काढले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ४० हजार रुपये आहे. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रि
ज्ञ


छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर पोलिसांनी मागील पाच महिन्यांत चोरीस गेलेले आणि हरवलेले तब्बल २१ मोबाईल शोधून काढले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ४० हजार रुपये आहे. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून हे मोबाईल शहरातील विविध भागांसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून आणि परराज्यांतून हस्तगत करण्यात आले. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. पोलीस निरीक्षक एम. के. पालवे आणि सायबर डेस्कचे पोलीस हवालदार एस. डी. होडशिळ यांनी ही कामगिरी केली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande