
जळगाव, 14 नोव्हेंबर (हिं.स.) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज, शनिवारी बाजार उघडताच सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र, चांदीच्या दरात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ०३५ रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.दुसरीकडे, चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र कायम आहे. आज चांदीच्या दरात प्रति किलो एक हजार रुपयांची घसरण झाली असून, जळगावच्या सराफ बाजारात चांदीचा भाव आता विनाजीएसटी १ लाख ८० हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे.सोन्याचे दर स्थिर असताना चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर