पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप; ऑडिओ क्लिप समोर, जमादार यांची प्रतिक्रिया देण्यास नकार
रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। “मी या जिल्ह्याचा बाप आहे, पुढच्या वेळी समोर आलास तर जागेवर ठोकेन, घरी पोलीस पाठवून अटक करीन,” अशा शब्दांत पत्रकार शिवाजी जाधव यांना धमकावल्याचा आरोप पुढे आला आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्याने रायगडमधील
NCR क्रमांक ०५६३/२०२६


NCR क्रमांक ०५६३/२०२६


रायगड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। “मी या जिल्ह्याचा बाप आहे, पुढच्या वेळी समोर आलास तर जागेवर ठोकेन, घरी पोलीस पाठवून अटक करीन,” अशा शब्दांत पत्रकार शिवाजी जाधव यांना धमकावल्याचा आरोप पुढे आला आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आल्याने रायगडमधील पत्रकारिता क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी महबूब जमादार यांच्याविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम NCR क्रमांक ०५६३/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१० ऑक्टोबर २०२६ रोजी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषद संपल्यानंतर माईक घेण्यावरून आपला महबूब जमादार यांच्याशी वाद झाल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर जमादार यांनी फोन करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ऐकविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खोपोलीतील आयोजित पत्रकार परिषदेत जाधव यांनी जमादार यांच्यावर यापूर्वीही खंडणीसंबंधी गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला. २०२२ मधील गुन्ह्याचा संदर्भ देत व्यापारी आणि सामान्य नागरिकांना धमकावल्याचे आरोपही त्यांनी केले. कर्जत येथील एका पत्रकाराकडून बातमी प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली ३,५०० रुपये घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकरणी अलिबाग येथील पोलीस अधीक्षक आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, महबूब जमादार यांच्याशी संपर्क साधला असता, “मला या प्रकरणात माझी बाजू मांडायची नाही. मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला जे काही करायचे आहे, ते मी पोलीस ठाणे किंवा न्यायालयाच्या माध्यमातून करेन,” असे त्यांनी सांगितले.

कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता आणि आरोपांबाबतची वस्तुस्थिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकारानंतर पत्रकार कोणत्याही माध्यमात (वृत्तपत्र, टीव्ही किंवा डिजिटल/यूट्युब) काम करत असला, तरी प्रत्येक पत्रकाराचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी तीव्र भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande