अन्वी घाटगे यांच्याकडून पाचव्यांदा कळसुबाई शिखर सर
कोल्हापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पांजरे या खडतर व आव्हानात्मक कातळकडा मार्गे 7 वर्षीय अन्वी घाटगे हिने महाराष्ट्रतील सर्व्वोच कळसुबाई शिखर सर केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई या शिखरावर चढाई करत
अन्वी घाटगे हिने कळसुबाई शिखर सर केले


कोल्हापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पांजरे या खडतर व आव्हानात्मक कातळकडा मार्गे 7 वर्षीय अन्वी घाटगे हिने महाराष्ट्रतील सर्व्वोच कळसुबाई शिखर सर केले.

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई या शिखरावर चढाई करत जल, जंगल, जमीन प्रदूषण मुक्त ठेऊयात हा संदेश त्याने कळसुबाई शिखरावरून दिला आहे.

वयाच्या 2 वर्ष 11महिने ची असताना 1 जुलै 2022 रोजी अन्वी ने सर्वप्रथम कळसुबाई शिखर स्वतःच्या पावलानी चढत सर केले.

यानंतर दरवर्षी अन्वी कळसुबाई शिखर सर करत असते, यंदा चे पाचवे वर्ष असून पांजरे या अत्यंत खडतर व कातळमार्गाने अन्वी ने हे शिखर सर करत विक्रम नोंदविला आहे.

अन्वी ने आतापर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा राज्यातील सर्वोच्च शिखरे ते हिमालयातील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा हे शिखर पार करत आत्तापर्यंत 7 विश्वविक्रम, 8 आसिया बुक ऑफ रेकॉर्ड, 8 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले आहे. अन्वी च्या या विक्रमची दखल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकर च होणार आहे.

अन्वी या प्रत्येक वर्षी महापुरुषांच्या जयंतीच्या औचित्य साधून वेगवेगळे शिखरे सर करून प्रदूषण मुक्त, प्लास्टिक मुक्त शिखरे ठेवूया. गडावर कचरा टाकू नका... गड किल्ले वाचवा निसर्ग वाचवा. मुलगा मुलगी भेदभाव करू नका असे संदेश देत असते.

अन्वीला यासाठी प्रशिक्षक अनिता घाटगे, नाशिक वनविभाग चंद्रकांत तळपडे, एकनाथ उघडे, चंद्रकांत उघडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर कोल्हापूर जिल्हा उपजिल्हाधिकारी संदीप खिलारी, गायक बाळू जिरगे, गायक हिदंयात नायकवाडी,प्रा.छाया ठाकूर, प्रा. प्रमोद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande