अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर ५.१ तीव्रतेचा भूकंप
काबुल, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सो
अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर ५.१ तीव्रतेचा भूकंप


काबुल, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी मोजण्यात आली आहे.

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजून ७ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १७९ किलोमीटर खोलीवर होते.या भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही अफगाणिस्तानमध्ये दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.१ इतकी नोंदवण्यात आली होती. पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १३० किलोमीटर खोलीवर होते.

त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande