
लातूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या माध्यमातून चाकूर तालुका सोसायटी मधून विजयी झालेले श्री संतोष पाटील यांनी इंद्रायणी निवासस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली तसेच त्यांच्यामुळेच हा विजय अगदी सुकर झाला. यामुळे त्यांनी बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.
तसेच मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक संतोष पाटील यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहकार पॅनलचे विविध मान्यवर मंडळी चेअरमन मतदार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis