बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन; ४० कारखाने बंद
ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशातील मीरपूर येथे वस्त्रोद्योगाशी संबंधित कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन केले. कामगारांचे किमान मासिक वेतन ३० हजार टका करण्याची त्यांची मागणी आहे.आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांन
३० हजार टका वेतनासाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन; ४० कारखाने बंद


ढाका, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशातील मीरपूर येथे वस्त्रोद्योगाशी संबंधित कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन केले. कामगारांचे किमान मासिक वेतन ३० हजार टका करण्याची त्यांची मागणी आहे.आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.बांगलादेशात सध्या वस्त्रोद्योगातील कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे अनेक कारखाने बंद असून, हिंसाचाराच्या घटनाही समोर येत आहेत.

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, बांगलादेशातील वस्त्रोद्योगातील कामगार अधिक वेतनाच्या मागणीसाठी संपावर आहेत. या आंदोलनांमुळे अनेक औद्योगिक क्षेत्रांतील कारखाने बंद झाले आहेत. कामगारांनी वारंवार वेतन आणि कामाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.एका माध्यमाच्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजता सावर येथील हेमायतपूरमधील 'पद्मार मोर' येथे कामगारांचा एक गट जमला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शांततेने तेथून निघून जाण्यास सांगितले. यानंतर कोणताही अनुचित प्रकार न घडता कामगारांनी रस्ता मोकळा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सावर आणि अशुलिया औद्योगिक क्षेत्रांतील सुमारे ४० कारखाने बंद होते. यापैकी २७ कारखाने बांगलादेश कामगार कायद्याच्या कलम १३(१) अंतर्गत बंद करण्यात आले, तर ९ कारखाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली. उर्वरित कारखान्यांमध्ये नियमित सुट्टी होती.अशुलिया औद्योगिक पोलीस-१ चे पोलीस अधीक्षक मोहम्मद मोमिनुल इस्लाम भुईयां यांनी सांगितले की, एका कारखान्यातील कामगारांनी जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर जाण्यास नकार दिला.

कामगार कारखान्याच्या परिसरातच बसून राहिले. त्यानंतर व्यवस्थापनाने कारखान्यात सुट्टी जाहीर केली. अन्य दोन कारखान्यांतील कामगारांनीही काम थांबवून कारखान्याच्या आवारातच धरणे आंदोलन केले.ते पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील इतर कारखान्यांमध्ये कामगार शांततेत आपले काम करत होते.

दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या गृहजिल्ह्यातील गोपालगंज येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.सोमवारी जारी केलेल्या निवेदनात बॉर्डर गार्ड बांगलादेशने सांगितले की, संभाव्य हिंसक परिस्थितीचा सामना करण्यासाठी चिलखती वाहने (आर्मर्ड पर्सनल कॅरिअर) तैनात करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी अंगावर लावता येणारे कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे.गोपालगंजमध्ये पुन्हा राजकीय हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा तैनाती करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये शेख हसीना बांगलादेशात परतणार असल्याच्या वृत्तानंतर अवामी लीगच्या समर्थकांनी येथे आंदोलने केली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande