न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंट संकुलात गोळीबार: दोन सुरक्षा कर्मचारी जखमी; हल्लेखोराची आत्महत्या
आल्बनी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सोमवारी न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स परिसरात असलेल्या ‘को-ऑप सिटी’ या अपार्टमेंट संकुलात धक्कादायक घटना घडली. एका बंदूकधाऱ्याने दोन सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर आरोपीने स्वतःला एका अप
न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंट संकुलात गोळीबार: दोन सुरक्षा कर्मचारी जखमी; हल्लेखोराची आत्महत्या


आल्बनी, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।सोमवारी न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स परिसरात असलेल्या ‘को-ऑप सिटी’ या अपार्टमेंट संकुलात धक्कादायक घटना घडली. एका बंदूकधाऱ्याने दोन सुरक्षा अधिकाऱ्यांवर गोळीबार करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर आरोपीने स्वतःला एका अपार्टमेंटमध्ये कोंडून घेतले.

वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. काही वेळानंतर हल्लेखोर अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी झालेल्या दोन्ही सुरक्षा अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूयॉर्क पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेले दोघेही ‘को-ऑप सिटी डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी’चे अधिकारी होते. ते या अपार्टमेंट संकुलाच्या खासगी सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहेत. सुरुवातीला या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, नंतर जखमींच्या संख्येबाबत दुरुस्ती करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande