कै. किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी, आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। - राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित कै. किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएश
Late Kishore Suryavanshi


नाशिक, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।

- राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित कै. किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अतिशय ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ भागवत, प्रफुल्ल शाह व माजी चेअरमन गजाभाऊ आहेर यांच्या शुभहस्ते, आजच्या सामन्यांची नाणेफेक करून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे करण्यात आले.

राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे. या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. तसेच नाशिकच्या प्रीमिअर लीग व एन पी एल संघ लिलावात या खेळाडूंना स्थान मिळते. खास या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्य जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडतात. यावर्षीचे विशेष म्हणजे महिला खेळाडूंच्या संघांना देखील या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. यास उत्तम प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच वर्षी ६ महिला संघ सहभागी होत आहेत. निफाड तालुक्यातील महिला खेळाडूंच्या अतिशय उत्साह वर्धक प्रतिसादामुळे त्यांचे २ संघ तयार केले आहेत.

याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव चंद्रशेखर दंदणे, योगेश -मुन्ना- हिरे ,खजिनदार हेमंत देशपांडे, इतर पदाधिकारी ,तालुका निवड समिती सदस्य तसेच प्रशिक्षक : शिवाजी उगले, हेतल पटेल, महेन्द्र ( राजू ) आहेर, प्रवीण घुले, बाळासाहेब मांडलिक, विक्रांत मते, कुणाल कातकाडे, शांताराम मेणे, मंगेश शिरसाट, मंगेश गर्दे, श्रीपाद भट,संजय मराठे रतन कुयटे, चारुता नायर, शर्मिला साळी आदी उपस्थित होते.सहसचिव चंद्रशेखर दंदणे व योगेश-मुन्ना- हिरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन केले विवेक केतकर यांनी, तर शिवाजी उगले यांनी आभारप्रदर्शन केले. १८ ते २१ नोव्हेंबर साखळी व त्यानंतर बाद फेरी नंतर २२ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. पहिल्या सामन्यात दिंडोरीने चांदवड वर १४० धावांनी मोठा विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात कळवणने इगतपुरीवर ९० धावांनी मात केली. तर महिला स्पर्धेत सिन्नरने सटाणा संघावर ८ गडी राखून मोठा विजय मिळवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande