
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)
युवकांमध्ये व्यसनमुक्त भारताविषयी जनजागृती करण्यासाठी ‘मेरा युवा भारत, अमरावती’ आणि ‘पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पी. आर. पोटे पाटील कॉलेज, अमरावती येथे 'जिल्हास्तरीय युवा संसद भाषण स्पर्धे'चे आयोजन करण्यात आल्याचे
जिल्हा युवा अधिकारी (मायभारत),अक्षय निपाणे यांनी कळविले आहे.
अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनतेमुळे होणारे सामाजिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम याबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तसेच युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या संकल्पनेत तरुणांची भूमिका यावरही यातून विचारमंथन केले जाणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना वक्तृत्व, विचारशक्ती आणि सामाजिक भान प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहेत.राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या युवकांना दिल्ली येथील संसद भवनात विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना www.mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. युवकांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले असून स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 'माय भारत, अमरावती' जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधता येणार .
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी