महासत्तांमध्ये संघर्ष झाल्यास तो विनाशकारी ठरेल; शी जिनपिंग यांचा इशारा
बीजिंग, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनमधील शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपीईसी) शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत
महासत्तांमध्ये संघर्ष झाल्यास जगात अराजकता; शी जिनपिंग यांचा इशारा


बीजिंग, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनमधील शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (एपीईसी) शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेतली. या भेटीला त्यांनी ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले.

त्रिपक्षीय बैठकीची सुरुवात करताना ट्रम्प म्हणाले की, तिन्ही नेते जगभर चर्चेत असलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. अण्वस्त्रांची संख्या कमी करणे आणि त्यांच्या वापराचा धोका मर्यादित ठेवण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन देश विशेष स्थितीत आहेत. या तिन्ही देशांवर काही विशेष जबाबदाऱ्याही आहेत, असे त्यांनी नमूद केले. मतभेद असतानाही नेत्यांशी संवाद साधण्याचे महत्त्व ट्रम्प यांनी अधोरेखित केले. पूर्वी अनेक नेते मतभेद असल्यास समकक्षांशी चर्चा करण्याचे टाळत असत, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, संधी नाकारून कधीही शांतता प्रस्थापित करता येत नाही.

शी जिनपिंग यांनी ट्रम्प आणि पुतिन यांच्यासोबत झालेल्या या भेटीला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरवले. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, प्रमुख देशांमधील चांगले संबंध असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. शी म्हणाले, मोठ्या देशांमधील चांगले संबंध हा पर्याय नसून गरज आहे.तिन्ही देशांनी मिळून जागतिक शांतता आणि स्थैर्याचे रक्षण करावे, तसेच जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. मोठे देश परस्परांमध्ये संघर्ष करत असतील, तर जगात अराजकता निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मोठ्या शक्तींमध्ये समन्वय आणि सहकार्य असेल, तर जगात शांतता टिकून राहील, असे ते म्हणाले.

मोठे देश आपसात लढले, तर जगात अराजकता निर्माण होईल, असे शी यांनी स्पष्ट केले. त्यांनी तिन्ही नेत्यांना इतिहासातून धडे घेण्याचे आवाहन केले आणि जागतिक शांतता व स्थैर्य टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या सामूहिक जबाबदारीवर भर दिला.शी पुढे म्हणाले, अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते लढलेही जाऊ नये. ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

चीनची सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, चीन-अमेरिका संबंधांमध्ये मोठा धक्का बसू नये यासाठी अमेरिकेने तैवानच्या मुद्द्यावर योग्य भूमिका घ्यावी, असे शी जिनपिंग यांनी म्हटले.अण्वस्त्रांवर पूर्णपणे बंदी घालून ती नष्ट केली पाहिजेत आणि अण्वस्त्रमुक्त जग निर्माण केले पाहिजे, असेही शी यांनी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशिया, चीन आणि अमेरिका रचनात्मक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक स्थैर्य अधिक मजबूत करू शकतात, असे म्हटले. दुभाष्यामार्फत बोलताना त्यांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेचे रक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी या तिन्ही देशांची असल्याचे सांगितले. तसेच ऊर्जा सुरक्षेसह जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर नेत्यांनी चर्चा करावी, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande