अत्याचार पीडित कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी; जिल्हाधिका-यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसाला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आशिष ये
अत्याचार पीडित कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत अत्याचाराच्या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसाला शासकीय सेवेत नियुक्ती देण्याच्या तरतूद आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विष्णू महेश हिवराळे यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.

बडनेरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा क्रमांक 493/2022 मधील मृतक विशाल महेश हिवराळे यांच्या पात्र वारसदार विष्णू महेश हिवराळे यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तिवसा येथे गट-ड संवर्गातील सफाईगार पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.जिल्ह्यात यापूर्वी अशाप्रकारे 20 पात्र वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. अत्याचार पीडित कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ही कारवाई करण्यात येते.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande