
नाशिक, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। फिरायला जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चाळीसगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी असून, आरोपी दर्शन नविल गुजर (रा. ओझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, ह. मु. इंदिरानगर, नवीन नाशिक) याने पीडितेस फिरायला जाण्याचा बहाणा करून सोबत नेले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या नकळत लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गुजर याने पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिच्याकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दर्शन गुजरविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत. हा प्रकार डिसेंबर २०२५ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान इंदिरानगर येथे घडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI