
छत्रपती संभाजीनगर, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. उद्योजकांचा हा पुढाकार सामाजिक एकजूट आणि सहकार्याच्या भावनेचे उदाहरण ठरला आहे.
-----------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis