
चंदीगड, 02 नोव्हेंबर (हिं.स.)पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन दिवसांत तीन आमदारांनी पक्ष सोडला आहे. हे बंडखोर आमदार सोमवारी भाजपमध्ये सामील झाले.'आप'चे बंडखोर नेते कुंवर विजय प्रताप सिंह, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोरमाजरा हे दिल्लीत भाजपमध्ये सामील झाले.
भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी, निलंबित 'आप'चे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभेतील आमदारपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. अमृतसर उत्तर मतदारसंघाचे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंग संधवान यांना पाठवला आहे.
कुंवर विजय प्रताप सिंह यांनी, पंजाबचे इतर आमदार चेतन सिंह जोरमाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांच्यासह, दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पतियाळा जिल्ह्यातील समाना येथील चेतन सिंह जोरमाजरा आणि सनाउर येथील हरमीत सिंह पठाणमाजरा यांनी रविवारीच आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला होता.
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश हा 'आप'साठी एक संघटनात्मक आणि राजकीय आव्हान म्हणून पाहिलं जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे