
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।
भूजल संवर्धन व जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने राजगड तालुक्यातील गुंजवणे येथे नवीन वनराई बंधाऱ्याचे बांधकाम तसेच एका बंधाऱ्याचे पुनरुज्जीवनाचे कार्य भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने करण्यात आले.
लोकसहभागातून श्रमदानाद्वारे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बंधारा बांधण्याचे काम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका गावामध्ये काल भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारा करण्यात आल्याचे विभागाचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांच्यासह विविध अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु