आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी किंवा विकासकामांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी असते. याच जाणिवेतून आणि सेवाभावाच्या संस्कारांतून चिंचवडचे आमदार शंकर
Sankar Jagtap


पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी किंवा विकासकामांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी असते. याच जाणिवेतून आणि सेवाभावाच्या संस्कारांतून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बार्शी, भूम-परांडा, कळंब आणि गेवराई परिसरातील एक हजार गरजू शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक साहित्याचे रेशन किट आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या घरात सणाचा आनंद पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ३० टन जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

दुष्काळाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असतानाही ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे.

या मदत उपक्रमांतर्गत बार्शी परिसरातील शेलगाव आणि खडकलगाव येथील प्रत्येकी १५० अशा एकूण ३०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्यात येणार आहे. भूम-परांडा परिसरातील कासारी येथील १५० आणि सिरसाव येथील पारधी वस्तीतील १०० अशा २५० कुटुंबांना मदतीचा लाभ मिळणार आहे. कळंब परिसरातील गोलेगाव येथील १५० आणि दाभा येथील १०० अशा २५० कुटुंबांना रेशन किटचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच गेवराई तालुक्यातील लोणाळा येथील २०० कुटुंबांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून मदत पोहोचविण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण सात ठिकाणांवरील एक हजार शेतकरी कुटुंबांना या उपक्रमाचा आधार मिळणार आहे.

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक स्तरावर हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संकटकाळात केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजातील सक्षम घटकांनीही पुढाकार घेऊन गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही व्यापक भूमिका यामागे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande